dr.satish best web design developer for mac

नेसरी ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात वसलेले आमचे गाव म्हणजे नेसरी . इतिहासात नोंद असलेल्या सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी म्हणजे आमची नेसरी. नेसरी या आमच्या गावाकडे ग्रामीण भागातील विकसित झालेलं गाव म्हणून पाहिल जात. तसेच आठवड्यातील दर गुरुवारी बाजार भरतो आसपासच्या 10 ते 12 खेड्यातील ग्रामीण माणसे या बाजारात काही वस्तूंची खरेदी व विक्री करण्यासाठी येतात. येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा व कॉलेजस आहेत. याचा लाभ आसपासच्या खेड्यातून शिकण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींना होतो.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

नेसरी ग्रामपंचायत ही सन 1927 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पंधरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार व दलित वस्ती सुधार पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

सरपंच
सौ.वैशाली शिवाजी पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतो.

उपसरपंच
श्री.दयानंद शंकर नाईक

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री.परशराम भिमराव पाटील

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Nesari Grampanchayat
A/P- Nesari Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone :

Office : 02327-272060