महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात वसलेले आमचे गाव म्हणजे नेसरी . इतिहासात नोंद असलेल्या सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी म्हणजे आमची नेसरी.

नेसरी या आमच्या गावाकडे ग्रामीण भागातील विकसित झालेलं गाव म्हणून पाहिल जात. तसेच आठवड्यातील दर गुरुवारी बाजार भरतो आसपासच्या 10 ते 12 खेड्यातील ग्रामीण माणसे या बाजारात काही वस्तूंची खरेदी व विक्री करण्यासाठी येतात. येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा व कॉलेजस आहेत. याचा लाभ आसपासच्या खेड्यातून शिकण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींना होतो. गावामध्ये विविध धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. सर्व सण उत्सव एकत्र येऊन उत्साहाने साजरे करतात.


नेसरी ग्रामपंचायत ही सन 1927 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पंधरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार व दलित वस्ती सुधार पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

सरपंच - सौ.वैशाली शिवाजी पाटील  

उपसरपंच - श्री.दयानंद शंकर नाईक

ग्रामविकास अधिकारी - श्री.आनंदा विठोबा हसबे


सदस्य -

 • श्री.परसू केरबा नाईक
 • श्री.अमर मल्लिकार्जुन हिडदुगी
 • श्री.रामचंद्र विठोबा सपाटे
 • श्री.संतोष आप्पा सुतार
 • श्री.अशोक महादेव पांडव
 • श्री.प्रशांत उर्फ परशराम विठोबा नाईक
 • सौ.ताहिरा हसन अल्ली (खाजू) ताशिलदार
 • सौ.राजियाबी साहेबलाल मुजावर
 • सौ.साहेरा सिकंदर वाटंगी
 • सौ.मालुताई दतात्रय गुरव
 • सौ.सीमा देवेंद्र कांबळे
 • सौ.अंजना शरद साखरे
 • सौ.अनिता यशंवत मटकर

नेसरी ग्रामपंचायत ही सन 1927 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पंधरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार व दलित वस्ती सुधार पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.


ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
 • ग्रामस्वच्छता अभियान 
 • वृक्षारोपण कार्यक्रम 
 • सी.सी.टिव्ही 
 • मोफत वृक्ष वाटप,
 • कृषी उपक्रम,
 • कापडी पिशवी वाटप,
 • गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,
 • स्वच्छता मोहिम इ. 

ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
 • दलित वस्ती सुधार पुरस्कार  
 • निर्मल ग्राम पुरस्कार
 • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान  


 • गावामध्ये रस्ते बांधणे.
 • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
 • दिवाबत्तीची सोय करणे.
 • जन्म,मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे.
 • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
 • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
 • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
 • शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे.
 • रोजगार, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
 • गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवणे.

सरपंचाची कामे -

 • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
 • गावातील तंटे निर्विवाद मिटवणे.
 • गावाची स्वच्छता राखणे.
 • वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
 • गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला) इ.
 • गावचा सर्वांगीण विकास करणे. 
 • गावातील लोकाना मुलभूत सेवा पुरवणे.


सदस्यांची कामे -

 • सदस्यांनी आप-आपल्या वार्डाकडे नियमित लक्ष दयावे.
 • वार्डातील समस्या आपल्या पध्दतीने सोडवाव्यात.
 • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
 • वार्डाची स्वच्छता राखणे. इ.


ग्रामसेवकांची कामे -

 • गावात आलेल्या शासकीय अधिका-याचे आदरातिथ्य करणे.
 • गावामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी कार्यक्षम असणे.
 • गावकरी मंडळींना नव-नविन सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करणे. इ.


तलाठीचे कामे -

 • सातबारा उतारा देणे.
 • पंचनामा करणे.
 • रहिवासी दाखला देणे.
 • इतर शेती संबंधी कागदपत्र.
 • जमिन नावे लावणे. इ.


पोलिस पाटीलचे कामे -

 • गावात सु-व्यवस्था ठेवणे.
 • पोलिस पाटील यांचे कडील रहिवासी दाखला देणे. इ.

शैक्षणिक सुविधा :

गावामध्ये नर्सरी ते ज्युनिअर कॉलेज पर्यंत शिक्षणाची सोय आहे.

 • प्राथमिक शाळा - कुमार विद्यामंदिर नेसरी, 
 • माध्यमिक शाळा - एस.एस.हायस्कूल नेसरी
 • उच्च माध्यमिक - शिवाजी छत्रपती ज्युनिअर कॉलेज नेसरी


दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्धउत्पादन हा व्यवसाय असून गावामध्ये तीन दुध संस्था आहेत..

दूध संस्था व त्यांची नावे -

 • घटप्रभा सहकारी दुध उत्पादक संस्था
 • मिनाताई ठाकरे दुध संस्था
 • आक्काताई साखरे दुध संस्था


आरोग्य सुविधा :
गावामध्ये आरोग्याच्या सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालय नेसरी उपलब्ध आहे.

पोलिस स्टेशन :
गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावामध्ये पोलिस स्टेशन स्थापन केली आहे. त्यामुळे गावामध्ये व आजूबाजूच्या गावामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.

महिला बचत गट :
महिलांचा विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यांमार्फत महिलांचे आर्थिक, सामाजिक सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे.
 • जिजाऊ महिला बचत गट नेसरी
 • आदिशक्ती महिला बचत गट नेसरी
 • ओमकार महिला बचत गट नेसरी
 • कावेरी महिला बचत गट नेसरी
 • सहेली महिला बचत गट नेसरी

तरूण मंडळे :
तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात.
 • गजानन युवक मंडळ नेसरी
 • जबरदस्त तरुण मंडळ नेसरी
 • जय बजरंग तरुण मंडळ नेसरी
 • टेपुसुलतान तरुण मंडळ नेसरी
 • जयभीम तरुण मंडळ नेसरी

वित्तिय संस्था :
ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये नेसरी वि.की.का.स. सोसायटी, शिवशक्ती ग्रा.बि.पत.संस्था व आझाद ग्रा.बि.पत.संस्था यांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्था मार्फत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच्या आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते. 

वाचनालय : नेसरी वाचन मंदिर
गावातील मुला – मुलीना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाची स्थापना केली आहे. वाचनालयामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी हवी असणारी पुस्तके, जनरल नॉलेजची पुस्तके व इतरही मटेरियल (साप्ताहिके,मासिके) उपलब्ध करून दिले जाते. 

व्यायामशाळा : जयभीम व्यायाम शाळा
मुलांना शिक्षणाबरोबरच व्यायामाची हि सवय असावी यासाठी गावामध्ये व्यायाम शाळा काढली आहे. . 


गावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी, कृषीपुरक जोडधंदे व इतर लहान मोठ्या घरगुती व्यवसायाशी निगडीत आहे. गावातील बागायती कृषी क्षेत्र हे 118 हेक्टर 30 गुंठे इतके असून जिरायती कृषी क्षेत्र 487 हेक्टर इतके आहे.

प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, नाचना, भुईमूग, सोयाबीन तसेच आधुनिक पद्धतीने फुल शेती यांचे उत्पादन घेतले जाते. तर सिंचनासाठी गावाला घटप्रभा नदीचा आधार आहे. 

गावाचे ग्रामदैवत रवळनाथ व मसणाई देवी ही आहेत. मसणाई यात्रा व लक्ष्मी देवी यात्रा उत्साहात साजरी केली जाते. गावामध्ये गणपती मंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर हि मंदिरे आहेत. तसेच घटप्रभा नदी काठावर असलेले प्राचीन पांडव कालीन काशिलिंग मंदिर हि आहे. तसेच महिन्याच्या दर संकष्टीला गणपती मंदिरामध्ये संकष्टी साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात गणपती भक्त येतात. संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते.

सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक -

वेडात मराठे वीर दौडले सात ..

वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे, प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे होय. प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता. त्यांचे व बहलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे. या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बहलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला. ही लढाई आपल्या गडहिंग्लजमधील नेसरी खिंड येथे झाली.

प्रतापराव गुजर यांचे मुळ नाव कुड्तोजी असे होते. कुड्तोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.

विजापूराहून आलेल्या बहलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता, रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला. प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला. बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला. शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले. रयतेचे हाल करणार्‍या ‍बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस, ‘बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.’ असे पत्र धाडिले. राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे. असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले. त्यांच्या पाठोपाठ वरील सहा वीर होते. या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले. पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले. केवढे हे शौर्य या सात वीरांचे? साक्षात समोर मृत्यु आहे हे माहीत असून, हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले. पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले. ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले. या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.

नेसरी ग्रामपंचायत

पत्ता : मु.पो. नेसरी, तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर

महाराष्ट्र 416504

फोन नंबर : 9860039078, 02327-272060